दुर्गाडी किल्ला खाडीकिनारी नौदल संग्रहालय उभारणार

कल्याण दि.११ :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने दुर्गाडी उल्हास खाडी किनारी नौदल संग्रहालय उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने खाडी किना-याची प्रशस्त जागा नौदल संग्रहालयासाठी दिली असून भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त उप नौसेनाप्रमुख एस. व्ही. भोकरे यांनी गुरुवारी या जागेची पाहणी केली. शिवाजी महाराजांनी कल्याण मध्ये दुर्गाडी येथे पहिल्या आरमाराची उभारणी केली. या संग्रहालयाचा आराखडा नौदल विभागाकडून तयार केला जात आहे.

१११ मीटर लांबीच्या या संग्रहालयात १७ व्या शतकापासून ते १८ व्या शतकापर्यंत मराठा आरमारात कसे बदल होत गेले. ब्रिटिश राॅयल नौदलापासून ते स्वतंत्र भारताचा नौदल इतिहास या संग्रहालयात मांडण्यात येणार आहे. हा इतिहास चित्रकृती, शिल्प, कलाकृती, चलतचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित केला जाणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.