कामोठे येथे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक
नवी मुंबई दि.२३ :- कामोठे सेक्टर-२२मधील चाळीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली.
जयंत पाटील यांची ईडी चौकशी म्हणजे राजकीय दबावाचे षड्यंत्र – संजय राऊत
अटक करण्यात आलेल्यांमध्ये चार पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. हे सर्व बांगलादेशी नागरिक बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करून, तसेच घरकाम करून राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
‘शासन आपल्या दारी’ योजनेची व्याप्ती वाढणार – मुख्यमंत्री
कामोठे सेक्टर-२२ मधील मैदानालगतच्या चाळीत काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी याठिकाणी छापा घालून ही कारवाई केली.
हिंदू राष्ट्र जागृती अभियानाअंतर्गत हिंदू एकता दिंडीचे आयोजन
गेल्याच आठवड्यात पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने आसुडगाव सेक्टर-४ भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.