जयंत पाटील यांची ईडी चौकशी म्हणजे राजकीय दबावाचे षड्यंत्र – संजय राऊत
मुंबई दि.२२ :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीतर्फे होणारी म्हणजे राजकीय दबावाचे षड्यंत्र आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
अभिनेता, मॉडेल आदित्य सिंह यांचे निधन
ईडीच्या दबावाला जयंत पाटील बळी पडणार नाहीत. विरोधक जेव्हा भाजपच्या म्हणण्यानुसार वागत नाही, त्यांच्या दबावाला बळी पडत नाहीत तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून त्यांचे गुडघे टेकविण्याचा प्रयत्न केला जातो, असेही राऊत म्हणाले.
महाराणा प्रताप जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
२०२४ नंतर ईडी कार्यालयात कोणाला पाठवायचे? त्यांना किती वेळ कार्यालयात बसवायचे?, याची यादी आम्ही लवकरच जाहीर करू, असा इशाराही राऊत यांनी दिला.