Saturday, July 11, 2026
Latest:
ठळक बातम्या

श्रावण अधिकमास आल्याने नवीन शालिवाहन शकवर्ष १३ महिन्यांचे- ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण

मुंबई दि.१७ :- येत्या २२ मार्च रोजी श्रीशालिवाहन शके१९४५ शोभननाम नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. या नवीन संवत्सरात श्रावण महिना अधिक असल्याने हे वर्ष तेरा महिन्यांचे असणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. गुढीपाडव्याच्याच दिवशी भारतीय राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होत असून यापूर्वी २००४ या वर्षी असा योग आला होता. २०४२ मध्येही गुढीपाडव्याच्याच दिवशी राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.

नियम २९३ अन्वये विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विधानसभेत प्रस्ताव

नूतन शालिवाहन शक १९४५ हे संवत्सर २२ मार्च २०२३ पासून ८ एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे. या नूतन संवत्सरामध्ये १८ जुलै २०२३ ते १६ ॲागस्ट २०२३ श्रावण अधिकमास आला असल्याचे सांगून सोमण म्हणाले, त्यामुळे नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, गणेशचतुर्थी , नवरात्र, विजया दशमी, दीपावली इत्यादी सण १९ दिवस उशीरा येणार आहेत.

नीलम गोऱ्हे आणि राहुल नार्वेकर यांच्यातील मानापमान नाट्याचे विधानसभेत पडसाद

ठराविक सण हे ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी भारतीय पंचांगे ही चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असतांना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो , त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो.

बसमध्ये विसरलेल्या,गहाळ झालेल्या भ्रमणध्वनीची यादी ‘बेस्ट’कडून जाहीर

या नूतन वर्षी कर्क राशीत सूर्य असतांना १८ जुलै रोजी आणि १७ ॲागस्ट रोजी अशा दोन चांद्रमासांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निजश्रावण असे दोन श्रावणमास आले आहेत, अशी माहिती सोमण यांनी दिली. या नूतन शालिवाहन शक वर्षामध्ये ३५० वा शिवराज्याभिषेकोत्सव दिन येत असून २ जून २०२३ रोजी शिवराज शक ३५० चा प्रारंभ होत आहे. शालिवाहन शके १९४५ या नूतन वर्षामध्ये एकही अंगारकी संकष्ट चतुर्थी येत नाही. सुवर्ण खरेदीदारांसाठी सहा गुरुपुष्यामृत योग येणार आहेत. या नूतन संवत्सरामध्ये भरपूर विवाहमुहूर्त देण्यात आले असल्याचे सोमण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *