* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> राज्यातील कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

राज्यातील कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई दि.२० :- आधीच्या सरकारांनी केलेले पाप आपल्या माथी नको, अशी आमची भूमिका असून त्यामुळे राज्यात वादग्रस्त ठरलेल्या कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलची चौकशी का झाली नाही? – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कंत्राटी भरतीवरून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भरतीची सुरुवात काँग्रेस-राष्ट्रवादीनेच केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती, असे फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील कौशल्य केंद्रे स्थानिक तरुणांना जागतिक स्तरावरील रोजगार देतील- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मात्र ही मंडळी स्वत:चे पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आपण चर्चा केली. आता कंत्राटी भरतीचा हा अध्यादेश रद्द करणार आहोत, असे फडणवीस यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *