उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलची चौकशी का झाली नाही? – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि.२० :- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या ललित पाटीलची चौकशी का झाली नाही? यामागे काय कारण होते? ललित पाटीलची चौकशी न करण्यासाठी कोणाचा दबाव होता? असे प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केले.
ललितला डिसेंबर २०२० मध्ये अटक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते.
महाराष्ट्रातील कौशल्य केंद्रे स्थानिक तरुणांना जागतिक स्तरावरील रोजगार देतील- पंतप्रधान नरेंद्र मोदी
ठाकरे यांनीच ललित पाटीलकडे तेव्हाच्या शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुखपद सोपविले होते. पाटील याला अटक झाल्यावर लगेच पीसीआर मागण्यात आला. गुन्हा मोठा असल्याने याप्रकरणी लगेच पीसीआर देण्यात आला. पीसीआर मिळाल्यानंतर त्याला लगेच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सरकारी पक्षाकडून ललित पाटीलच्या चौकशीसाठी कोणताही अर्ज करण्यात आला नाही.
हवामानातील बदलांमुळे रुळांच्या दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेचा अघोषित ब्लॉक, लोकल सेवा विस्कळीत
पोलिसांकडून ललित पाटील याची चौकशीच झाली नाही. पीसीआरचा चौदा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ललित पाटील याला एमसीआर द्यावा लागला. या काळातही त्याची चौकशी झाली नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. एकूणच या प्रकरणात खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण त्या सर्व मी आत्ताच सांगणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.