पाकिस्तानी कलाकारांना विरोध ही देशभक्ती नव्हे – मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मत
मुंबई दि.२० :- देशभक्ती सिद्ध करण्यासाठी शेजारील देशाच्या कलाकारांशी शत्रुत्व, वैर बाळगण्याची आवश्यकता नाही. पाकिस्तानी कलाकारांना विरोध ही देशभक्ती नव्हे, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सुनील शुक्रे, शन्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने आज व्यक्त केले. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करणारी याचिकाही खंडपीठाने फेटाळून लावली.
राज्यातील कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित संस्थांसह, निर्माता संघटनांना, पाकिस्तानी चित्रपटकलाकार, गायक, संगीतकार, गीतकार आणि तंत्रज्ञांबरोबर काम करण्यास कायमस्वरूपी मज्जाव करण्याचा आदेश केंद्र सरकारला देण्याच्या मागणीसाठी फय्याज अनवर अन्सारी यांनी याचिका दाखल केली होती.
ही मागणी सांस्कृतिक सौहार्द, एकता, शांतता भंग करणारी तसेच पुरोगामी विचारांच्या विरोधात असून त्याचे समर्थन करता येणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.