नालेसफाईच्या कामाबाबत नागरिकांकडून अभिप्राय मागवावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२० :- नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे झाली की नाही, याची तपासणी करण्यासाठी जनतेकडून अभिप्राय मागवावेत. तसेच जनतेकडून नाल्यांची छायाचित्रे मागवून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला केली.
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेची अभय योजना – मालमत्ता कराची सुमारे अठराशे कोटीची थकबाकी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुंबई शहर आणि उपनगरात नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका प्रशासनास उपरोक्त सूचना केल्या.
चतुरंग प्रतिष्ठानच्या चैत्रपालवी संगीतोत्सवात संगीत सन्मान, संगीत शिष्यवृत्ती प्रदान
दरम्यान जून महिन्यात पहिल्या दहा दिवसात जनतेकडून अभिप्राय मागवून त्यादृष्टीने कामे पूर्ण करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. तसेच मुंबईतील रस्त्यावरील कचर्याची तक्रार नोंदविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ऑनलाईन प्रणाली येत्या सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही आयुक्त चहल यांनी सांगितले.