पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई, दि. ६ मृद आणि जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे केली. तसेच जलयुक्त शिवार अभियानाला पुन्हा गतीमान करण्यासाठी नियोजन करण्याची आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

मुंबईत उद्या १८७ सुशोभीकरण कामांचा शुभारंभ मुंबई सौंदर्यीकरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

शमृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंधारण महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मृद व जलसंधारण विभाग शेतकऱ्यांशी निगडित असा आहे. पाण्याची उपलब्धता, नियोजन आणि सिंचन सुविधा हा मोठा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेण्यात यावीत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे १ लाख ३ हजार ८३४ संरचनाच्या योजनांमुळे अप्रत्यक्षरीत्या सुमारे १७ लाख २४ हजार ९३३ हेक्टर सिंचन क्षमता स्थापित झाल्याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
——

‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव’ पुरस्कार दुर्ग संशोधक आप्पा परब यांना जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published.