देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात सैन्य दलांचे महत्वाचे योगदान – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई, दि. ७ देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात सैन्य दलांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी येथे केले.
जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक
सशस्त्र सेना ध्वज दिनाचे औचित्य साधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत बुधवारी राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
सैन्य दलातील हुतात्म्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक, जायबंदी झालेले जवान यांच्या कल्याणासाठी विविध संस्थांनी कर्तव्य भावनेने अधिकाधिक योगदान दिले पाहिजे, असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
याप्रसंगी राज्यपालांच्या जॅकेटला सशस्त्र सेनेच्या ध्वजाचे तिकीट लावण्यात आले व राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.
स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे प्रमुख अधिकारी ले.जन. एच.एस. कहलों, नौसेनेच्या पश्चिम विभागाचे मुख्य अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, एअर ऑफीसर कमाडींग हेडक्वाटर, मरिटाईम एअर ऑपरेशन रजत मोहन, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, सैनिक कल्याण विभागाचे संचालक राजेश पाटील तसेच ध्वज निधीला योगदान देणार्या संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी सन २०२१-२२ या वर्षात निधी संकलनात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी यावेळी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.
पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना
राज्यपालांच्या हस्ते दिलीप गुप्ते लिखित ‘महारथी महाराष्ट्राचे भाग – ३ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हुतात्मा अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांना एक-भारत रजत मुद्रिका भेट देण्यात आली.
मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा
मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांनी गेल्या वर्षी ६.५ कोटी इतका ध्वजनिधी संकलित केल्याचे सांगून आगामी वर्षात दोन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी ३.८४ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याचे उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितले. मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी ध्वज दिन निधी संकलन कार्याचा इतिहास सांगितला.
——-