* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> मुंबईत उद्या १८७ सुशोभीकरण कामांचा शुभारंभ मुंबई सौंदर्यीकरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

मुंबईत उद्या १८७ सुशोभीकरण कामांचा शुभारंभ मुंबई सौंदर्यीकरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई, दि. ७ मुंबईतील सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा शुभारंभ उद्या (८ डिसेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मुंबईची ‘दिल्ली’ झाली! हवेची गुणवत्ता ढासळली, धुलीकणांचे प्रमाण जास्त

सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईच्या सौंदर्यीकरणाबाबतच्या कामाचा आढावा घेतला.

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार राहूल शेवाळे, आमदार आशीष शेलार आदी उपस्थित होते.

नाहीतर ‘सोमनाथ’चीही ‘बाबरी’ झाली असती – शेखर जोशी

मुंबई सुशोभीकरणाच्या कामाला गेल्या चार महिन्यात वेग देण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कोळीवाड्यांचे सौंदर्यीकरण, आपला दवाखाना यासारख्या निर्णयांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

गुजरातमध्ये पुन्हा भाजपच मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज हिमाचलमध्ये चुरस

स्वच्छता या विषयाला प्राधान्य देऊन दृष्यस्वरूपात बदल दिसावेत यासाठी ५००० स्वच्छतादूतांची नेमणूक करावी, महत्वाच्या इमारतींवर रोषणाई केली जावी, महत्वाचे रस्ते, चौक, स्कायवॉक, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण करावे, पूर्व द्रूतगती मार्ग आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर अद्ययावत स्वच्छतागृहांची उभारणी तातडीने करावी अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या.

महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईतील रस्ते, समुद्र किनारे, शौचालये यांची सतत स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री शहराच्या स्वच्छतेच्या गरजा ओळखून महापालिकेने घ्यावी. स्वच्छतेच्याबाबतीत जगातील ज्या सर्वोत्तम संकल्पना आहेत त्या मुंबईत राबवाव्यात. झोपडपट्टी भागात ‘कम्युनिटी वॉशिंग मशिन’ ही संकल्पना अंमलात आणावी.

सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबई सौंदर्यीकरणाचे सादरीकरण केले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *