लोकमान्य गुरुकुलचा आगळावेगळा वर्षांत समारंभ
डोंबिवली दि.०१ :- टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, लोकमान्य गुरुकुलाचा वर्षांत समारंभ सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. डॉ. प्रा. प्रसाद भिडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गुरुकुल शाळेने भारतातील गुरुकुल पद्धती जपून विद्यार्थ्यांचा मन, बुद्धी आणि शरीर याचा समतोल घडवून आणला आहे, असे डॉ. भिडे यांनी सांगितले.
‘हुतात्मा स्मारक’टपाल तिकीटाला अद्याप मुहूर्त नाही
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांनी, विद्यार्थ्यांनी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपण आपला आहार कसा राखला पाहिजे? याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व्यंकटेश प्रभुदेसाई यांनी केले. ‘उज्ज्वल भारत’ चे सूत्रसंचालन पार्थ डोळस, सान्वी नेरकर, हेमांगी भुसेवार या विद्यार्थ्यांनी केले. सुलोचना गोरे-चौधरी यांनी आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ उपक्रम देशवासीयांना प्रेरणा देणारा- रामदास आठवले
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत, कार्याध्यक्ष श्री. श्रीकांत पावगी आणि संस्थेचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ‘ हे प्रभो विभो ‘ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘आईगिरी नंदिनी’ अशी देवीची आळवणी करून देवीला नमन करण्यात आले.’शिवबा आमचा मल्हारी’ या गाण्यावर लहान मुलांनी नृत्य सादर केले. लहान आणि मोठ्या सर्व विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
‘वेध एक्टिंग अकादमीने’ बसवलेले ‘गोष्ट एका ज्ञानमंदिराची’ हे नाटक यावेळी सादर झाले. वर्षभरातील काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. प्रा. भिडे आणि संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संपूर्ण वंदे मातरमने वर्षांत समारंभाची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वर्षभर काढलेल्या सुंदर चित्रांचे तसेच कौशल्य विकसन शिबिरात तयार केलेल्या वस्तूंचे, रांगोळ्यांचे प्रदर्शन सावित्रीबाई फुले कलादालनात भरविण्यात आले होते.