‘हुतात्मा स्मारक’टपाल तिकीटाला अद्याप मुहूर्त नाही

मुंबई दि.३० :- संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील स्मरणार्थ २१ नोव्हेंबर १९६१ रोजी उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकावरील टपाल तिकीटाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. ऐतिहासिक हुतात्मा स्मारकाचे टपाल तिकीट प्रकाशित करावे यासाठी संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष महादेव गोविंद उर्फ भाऊ सावंत महाराष्ट्र शासनाकडे गेली २५ वर्षे पाठपुरावा करत आहेत.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे विविध कार्यक्रम.

मात्र हे टपाल तिकीट अद्याप प्रकाशित झालेले नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात १०७ हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले.  हुतात्मा स्मारक महाराष्ट्राची अस्मिता , तसेच संयुक्त महाराष्ट्र लढायचा इतिहास जागविणारे प्रेरणास्थान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ उपक्रम देशवासीयांना प्रेरणा देणारा- रामदास आठवले

१८ मार्च २००४ रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर २००६ मध्ये उपमुख्यमंत्र्यांनी दूरसंचार मंत्रालयाला प्रस्ताव पाठविला होता. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. दरम्यान गेली २५ वर्षे हुतात्मा स्मारक टपाल तिकिटाचा प्रश्न प्रलंबित असल्याबद्दल भाऊ सावंत यांनी खेद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.