विद्यार्थ्यांनी करीयरच्या वाटा निवडताना भविष्यातील संधींचा विचार करावा – गिरीश टिळक
डोंबिवली दि.०१ :- करिअरची वाट निवडताना विद्यार्थ्यांनी भविष्यातील संधींचा विचार करावा, असे प्रतिपादन गिरीश टिळक यांनी केले. भारत विकास परिषद आणि श्री. लक्ष्मी नारायण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानसंध्या कृतीसंध्या’ उपक्रमाअंतर्गत टिळक बोलत होते. दहावी, बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना त्यांनी करिअर मार्गदर्शन केले.
लोकमान्य गुरुकुलचा आगळावेगळा वर्षांत समारंभ
माहिती, संवाद आणि ज्ञान यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी करिअर कसे निवडावे कुठल्या गोष्टीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा, कुठले पर्याय उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती टिळक यांनी दिली.
‘हुतात्मा स्मारक’टपाल तिकीटाला अद्याप मुहूर्त नाही
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल कुवळेकर यांनी केले. सुरेखा जोशी यांनी श्री लक्ष्मीनारायण संस्थेचा परिचय करून दिला. भारत विकास परिषदेच्या अध्यक्ष वृंदा कुलकर्णी यांनी भारत विकास परिषदेच्या कामाची माहिती दिली. गौरी शिंगवेकर यांनी आभार मानले. या मालिकेतील पुढील सत्र २७ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. आरोग्य व पोषक आहार – भरड धान्ये या विषयावर डॉ. पुष्कर वाघ यांचे व्याख्यान होणार आहे.