मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे विविध कार्यक्रम.
मुंबई दि.३० :- मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे उद्या १ मे रोजी मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ध्वजारोहणानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभापर्यंत प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात येणार आहे.
१ मे ते १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठावाडा मुक्तीसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता त्यासाठी एक समितीही स्थापन केली होती मात्र राज्यातले सरकार बदलताच सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा विसर पडला. राज्य शासनाचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगण्यात आले.