पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ उपक्रम देशवासीयांना प्रेरणा देणारा- रामदास आठवले
मुंबई दि.३० :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवर सुरू केलेला ‘मन की बात’ उपक्रम देशवासीयांना प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ उपक्रमाचा १०० वा भाग आकाशवाणीवर प्रसारीत करण्यात आला. त्याचे सामुहिक श्रवण हरियाणा येथील कर्नाल मधील शासकीय विश्रामगृहावर आठवले यांनी केले.
या कार्यक्रमाने इतिहास घडविला असून जगातील हा अनोखा उपक्रम आहे. ‘युनो’च्या कार्यालयातही आज ‘मन की बात’ चे श्रवण करण्यात आले, अशी माहिती आठवले यांनी दिली. लोकशाहीमध्ये ‘मन की बात’ नाही
तर ‘जनता की बात’ करावी लागते :- नाना पटोले
लोकशाहीमध्ये ‘मन की बात’ नाही तर ‘जनता की बात’ करावी लागते, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे चे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. देशातील जनता महागाईत होरपळून निघत असून सीमेवर चीनच्या भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत. पण मोदी चीनचा साधा उल्लेखही करण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत. काँग्रेसला शिव्या देणे आणि स्वतःची स्तुती करणे यापलिकडे मोदींची ‘मन की बात’ पुढे सरकतच नाही.