मध्य रेल्वेवर उद्या रात्रीच्या वेळेत तर हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी मेगाब्लॉक
मुंबई दि.०३ :- देखभाल-दुरुस्तीसाठी आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन तर हार्बर मार्गावर रविवारी दिवसा हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते भायखळा अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.३५ ते पहाटे ४.३५ असा चार तासांचा ब्लॉक असणार आहे. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणार्या अप मेल / एक्स्प्रेस माटुंगा आणि भायखळ्यादरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन
तसेच दादर येथील फलाट क्रमांक ३ वर एक्स्प्रेसला दोनदा थांबा देण्यात येणार असून डाऊन मेल / एक्स्प्रेस माटुंगा आणि भायखळ्यादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या एक्स्प्रेसना दादर फलाट क्रमांक १ वर दोनदा थांबा देण्यात येणार आहे. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
राज्यात आणखी चार ठिकाणी ‘पुस्तकांचे गाव’
परिणामी हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर आणि बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच ठाणे ते वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यानही लोकल सेवा उपलब्ध असणार आहे.