दिवाळीपर्यंत गोखले पुलाची एक बाजू सुरू करण्यात येईल – मंगलप्रभात लोढा
मुंबई दि.३१ :- येत्या दिवाळीपर्यंत (नोव्हेंबपर्यंत) गोखले पुलाची एक बाजू सुरू करण्याच्या दृष्टीने वेगाने काम करण्यात येईल, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रविवारी दिली. लोढा यांनी गोखले पुलाचा पाहणीदौरा केला. त्यावेळी लोढा बोलत होते.
पुलाच्या पाहणीनंतर लोढा यांनी उपनगरांमध्ये रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामांचाही आढावा घेतला. इर्ला मार्ग जंक्शन, व्ही. एम मार्ग, एस. व्ही. मार्ग जंक्शन, सहार मार्ग जंक्शन, साकीनाका जंक्शन, कांजूरमार्ग आदी ठिकाणी लोढा यांनी भेट दिली.
मुंबई गोवा महामार्गासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन
जोरदार पावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे भरण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका सक्रिय झाली असून पावसाने उघडीप दिल्याने खड्डे भरण्याच्या कामांनाही वेग दिला जात आहे. मुंबई शहर व उपनगरात सुमारे ४० संयंत्रे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे भरण्यात येत आहेत. असेही लोढा यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त उल्हास महाले आदी अधिकारी उपस्थित होते.
