ठळक बातम्या

पायाभूत सुविधाच नव्हे तर इतरही क्षेत्रातही संस्थात्मक क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई दि.३१ :- जागतिक बँकेच्या सहकार्याने यापूर्वीही राज्यात अनेक मोठे प्रकल्प उभारले गेले आहेत. पण केवळ पायाभूत सुविधांसाठी नव्हे तर इतरही क्षेत्रांतही संस्थात्मक क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांसमवेत हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुंबई गोवा महामार्गासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनोज सौनिक, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी तसेच विविध विभागांचे सचिव तसेच जागतिक बँकेतर्फे भारतातील कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर तसेच विविध देशांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते. जागतिक बँक ही केवळ निधी देणारी संस्था नाही तर त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे विकसनशील देशांसाठी ज्ञानाचा मोठा स्रोत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टतर्फे निराधार मुलामुलींना वस्त्रदान

पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळविणे तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भातील नदी जोड प्रकल्पातून तेथील जिल्ह्यांमधील दुष्काळ संपविणे याला प्राधान्य असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय आणि सचिव शैला ए यांनी सादरीकरण केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई महानगरातील वाहतुकीमधील सुधारणा प्रकल्प, हरित ऊर्जा यांचा यात समावेश होता.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *