महापालिकेच्या तरण तलावांमध्ये पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार
मुंबई दि.२६ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या ६ जलतरण तलावांमध्ये येत्या २ मे पासून २१ दिवस पोहोण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीतून मुक्तता – दीपक केसरकर
‘प्रथम येणाऱ्या प्रथम प्रवेश’ या पद्धतीने प्रवेश दिला जाणार असून याच प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा २३ मे पासून सुरू होणार आहे, अशी माहिती उप आयुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी यांनी दिली. हे प्रशिक्षण माफक शुल्कात देण्यात येणार आहे. पंधरा वर्षांपर्यंत २ हजार, तर त्या पुढील वयोगटासाठी ३ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. जलतरण प्रशिक्षण दररोज दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३ आणि ३.३० ते ४.३० अशा तीन तुकड्यांमध्ये २१ दिवसांसाठी दिले जाणार आहे.
वाढते प्रदुषण, धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिका स्तरावर कृती दलाची स्थापना
महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.