Thursday, June 25, 2026
Latest:
ठळक बातम्या

BMC: रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी आणखी नऊ यांत्रिकी झाडूंची खरेदी

बृहन्मुंबई महापालिकेचा निर्णय
मुंबई, दि. ११
शहर आणि उपनगरांतील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी लवकरच आणखी नऊ यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी १५ व्या वित्त आयोगाने बृहन्मुंबई महापालिकेला निधी दिला आहे.

शहर व पूर्व उपनगरांसाठी चार व पश्चिम उपनगरासाठी पाच ई-यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात येणार आहेत.यासाठी निविदा मागवल्या होत्या. निविदा प्रक्रियेअंती कंत्राटदार निश्चित करण्यात आले असून त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

वाहनांवरील नऊ झाडूंची खरेदी आणि चार वर्षे देखभाल व प्रचालन या कामासाठी ४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *