अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार वितरण सोहळा उद्या रंगणार
अंबरनाथ दि.१९ :- अंबर भरारी, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (शनिवारी) अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार सोहळ्याचे यंदा आठवे वर्ष आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात टाळण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचा विशेष कृती आराखडा
यंदाच्या चित्रपट महोत्सवासाठी ४० मराठी चित्रपट नामांकनासाठी दाखल झाले होते. त्यातून ताठ कणा, समायरा, पिकासो, अनुभूती, आय एम सॉरी, येरे येरे पावसा, भीरकिट, शेर शिवराज है, गडद अंधार या चित्रपटांमध्ये विविध विभागांमध्ये चुरस आहे. अभिनेते गिरीश कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, चिन्मय मांडलेकर, उमेश कामत, प्रणव रावराणे यांना अभिनयातील विविध विभागांसाठी नामांकन प्राप्त झाले आहे.
केक कापून शनीदेवाचा वाढदिवस साजरी करण्याची पाश्चात्य प्रथा बंद करा – महाराष्ट्र मंदिर महासंघ
अभिनेत्रींमध्ये नेहा महाजन, मोनालिसा बागल, स्वानंदी बेर्डे, रिंकू राजगुरू, रूपाली भोसले, दीप्ती देवी यांना नामांकन मिळाले आहे. घोषित पुरस्कारांमध्ये प्रसाद ओक, वर्षा उसगावकर, पौर्णिमा अहिरे, केतकी नारायण यांचा समावेश आहे. हा सोहळा शनिवारी सायंकाळी सात वाजता अंबरनाथ पूर्व येथील गावदेवी मैदानात होणार आहे.