समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात टाळण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचा विशेष कृती आराखडा
मुंबई दि.१९ :- महामार्ग संमोहनामुळे (रोड हिप्नोसिस) मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. आराखड्यातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
केक कापून शनीदेवाचा वाढदिवस साजरी करण्याची पाश्चात्य प्रथा बंद करा – महाराष्ट्र मंदिर महासंघ
समृद्धी महामार्गावरील रस्ते विविध रंगांनी रंगविण्यात येणार असून महामार्गाच्या दुतर्फा विशिष्ट अंतरावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच सचित्र फलक लावण्यात येणार असून वाहनांचा वेग वाढल्यास धोक्याची सूचना वाजणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बंधनकारक
या सर्व उपाययोजनांमुळे महामार्ग संमोहन रोखण्यास मदत होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून व्यक्त करण्यात येत आहे. अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या वेगमर्यादेवर लक्ष, वेगमर्यादा न पाळणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई, वाहनचालकांचे समुपदेशन, पोलिसांची गस्तही इत्यादी विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत.