केक कापून शनीदेवाचा वाढदिवस साजरी करण्याची पाश्चात्य प्रथा बंद करा – महाराष्ट्र मंदिर महासंघ
मुंबई दि.१९ :- श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्चर या देवस्थानाच्या ठिकाणी गेल्या तीन, चार वर्षांपासून काही भाविकांनी केक कापून देवाचा वाढदिवस साजरा करण्याची अशास्त्रीय कुप्रथा सुरू केली आहे. ही अशास्त्रीय पाश्चात्य प्रथा बंद करावी, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. धर्मशास्त्रानुसार कोणताही शास्त्रीय आधार नसतांना, तसेच देवस्थानच्या लिखित घटनेतही उल्लेख नसतांना देवतेच्या ठिकाणी पाश्चत्त्यांप्रमाणे केक कापण्याचा प्रकार कशासाठी केला जात आहे ? असा प्रश्न महासंघाने उपस्थित केला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बंधनकारक
या विषयीचे निवेदन श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील श्री शनैश्चर देवस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले. असे प्रकार होऊ नयेत म्हणून देवस्थानच्या वतीने योग्य ती काळजी घेण्यात येईल’, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी शेटे यांनी शिष्टमंडळाला दिले. हिंदु धर्मशास्त्रानुसार देवतेच्या जन्मदिनी विविध धार्मिक विधी प्रथा-परंपरेनुसार सारजे केले जातात.
२०२८ लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील : राजदूत एरिक गारसेटी
भारतातीत बहुतांश देवालयांमध्ये तेथील देवतांचा जन्मोत्सव वा जयंती साजरी केली जाते; मात्र कोठेही केक कापण्यासारखी कृती केली जात नाही. हिंदूंच्या मंदिराच्या ठिकाणी चालणारे असे अशास्त्रीय प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. हे प्रकार थांबले नाहीत, महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने हिंदू रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समनव्यक सुनील घनवट यांनी दिला आहे.