‘आभा’ प्रणालीमुळे रुग्णाची आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध होणार

बृहन्मुंबई महापालिकेच्या ११ विभागांमध्ये पथदर्शी उपक्रम

मुंबई दि.१२ :- आरोग्यसेवा क्षेत्राला डिजिटल बळकटी देण्यासाठी, तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ‘ऑनलाइन’ व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशभरात ‘आयुष्मान भारत डिजिटल मोहीम’ सुरू केली आहे. बृहन्मुंबई महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभागदेखील या डिजिटल उपक्रमात सहभागी झाला असून, ‘पाथ’ या संस्थेच्या सहकार्याने बृहन्मुंबई महापालिकेच्या ११ विभागांमध्ये पथदर्शी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर आपण निवडणुकीला सामोरे जाऊ या- उद्धव ठाकरे

सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती व उपचारविषयक नोंदी या ‘आभा’च्या संगणकीय प्रणालीत नोंदवून ‘आयुष्मान भारत डिजिटल उपक्रमात सगभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. याबाबत अधिक माहिती देतांना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांक (आभा), आरोग्य क्षेत्रातील व्यवसायिकांच्या नोंदी (एचपीआर), आरोग्य सुविधा नोंदी (एचएफआर) आणि ‘आभा अप्लिकेशन’ आदी महत्वपूर्ण बाबी आणि त्यावर आधारित सुविधांचा यात समावेश आहे.

Dombivali ; शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच तीनचाकी टेम्पो चोरीला

‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ याअंतर्गत ‘आयुष्मान भारत आरोग्य कार्ड’ (आभा कार्ड) वितरण प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. त्यासाठी रुग्णांची संपूर्ण माहिती ‘आयुष्यमान भारत’शी जोडण्यात येत आहे. यामुळे सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर पाहू शकतील. यासाठी देशातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र सुविधा आहे. यामुळे रुग्णांवरील उपचाराचे पुढील नियोजन, तपासण्यांचा प्रत्येक अहवाल या व्यासपीठावर सहज उपलब्ध होऊ शकेल. रुग्ण कोणत्याही शासकीय रुग्णालयात किंवा या योजनेशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात गेल्यास तेथील डॉक्टर अवघ्या काही क्षणात त्याच्या आरोग्याचा तपशील पाहून उपचाराची दिशा ठरवू शकतील, असेही डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी आणि तांत्रिक सहाय्य देण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या विभागस्तरावर सत्रे आणि भेटींचे आयोजन करण्यात येत आहे. आत्तापर्यंत १ हजार वैद्यकीय व्यावसायिकांनी आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेत नोंदणी केली आहे. तर, २ हजार २५० वैद्यकीय व्यायवसायिकांनी सहभागी होण्यास तयारी दर्शविली आहे. तसेच ८५० वैद्यकीय व्यावासायिक ‘इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड’ तयार करण्यासाठी या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.