गुन्हे-वृत

धावत्या गाडीत पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू – गोळीबार करणाऱ्या पोलीसाला अटक

मुंबई दि.३१ :- जयपूरहून मुंबईला येणाऱ्या १२९५६ जयपूर एक्स्प्रेसच्या बी ५ या डब्यात आज सकाळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांने केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. चेतन सिंह असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

डॉ. सदानंद मोरे यांचे उद्या व्याख्यान

या गोळीबारात आरपीएफच्या उपनिरिक्षकासह चार जणांचा मृत्यू झाला. जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस सकाळी मुंबई सेंट्रलकडे येत होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास गाडीत सुरक्षेसाठी कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन सिंह याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम मीना यांच्यासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

कोणताही मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत स्थानिकांचे प्रबोधन होणे गरजेचे – डाॅ. अनिल काकोडकर

ही एक्सप्रेस मीरा रोड स्थानकाजवळ पोहोचायच्या काही मिनिटे आधी एका प्रवाशाने सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेमधील आपत्कालीन चेन ओढून गाडी थांबवली. मीरा रोड स्थानकात गाडी थांबल्यानंतर चेतन सिंहने ट्रेनमधून उडी मारली आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मीरा रोड येथील जीआरपी आणि आरपीएफच्या पोलिसांनी धाडसाने चेतनला पकडले. चेतन सिंहने गोळीबार का केला? याचे कारण कळू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *