ठळक बातम्या

कोणताही मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत स्थानिकांचे प्रबोधन होणे गरजेचे – डाॅ. अनिल काकोडकर

ठाणे दि.३१ :- जैतापूर आणि नाणार या प्रकल्पांचा विरोध समजून घेणे आवश्यक आहे. देशात कोणताही मोठा प्रकल्प येणार असेल तेव्हा जमीन अधिग्रहणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनामध्ये अतिक्रमण होते. त्यामुळे स्थानिकांचे प्रकल्पाबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर यांनी येथे केले. वैष्णो व्हिजन आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भेट दिग्गजांची’ या मुलाखत मालिकेचा शुभारंभ रविवारी डाॅ. काकोडकर यांच्या मुलाखतीने झाला. मनाली दीक्षित यांनी डॉ. काकोडकर यांची प्रगट मुलाखत घेतली.

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन यंत्रमानव दाखल होणार – पूर्व आणि पश्चिम उपनगरात उपयोग

देशात कोणताही मोठा प्रकल्प येणार असेल तेव्हा जमीन अधिग्रहणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनामध्ये अतिक्रमण होत असते. त्यामुळे तेथील नागरिकांना मोबदला मिळाला पाहिजे, त्यांचे स्थलांतर झाले पाहिजे. बऱ्याच ठिकाणी लोकांना अनुभव चांगला नसतो. त्यामुळे लोक भरडली जातात. कोणत्याही प्रकल्पाचा परिणाम सकारात्मक होईल असा लोकांना विश्वास वाटला तर होणारा विरोध थांबेल, असेही डॉ. काकोडकर यांनी सांगितले.

दिवाळीपर्यंत गोखले पुलाची एक बाजू सुरू करण्यात येईल – मंगलप्रभात लोढा

जैतापूर आणि नाणार या दोन्ही प्रकल्पांतील गुंतवणूक मोठी आहे. ज्या ठिकाणी हे प्रकल्प होणार तेथे पुरवठादार तसेच विविध माध्यमातून अर्थकारण होणार आहे. यामध्ये बाहेरच्या लोकांचा आणि स्थानिकांचा किती? हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होते. या लोकांच्या हातून चांगले घडेल असा स्थानिकांना विश्वास पटला तर, विरोध थांबेल, परंतु सध्या तशी परिस्थिती नाही. कारण आपल्या येथील राजकारण तेवढे चांगले नाही. ही खरी शोकांतिका असल्याचेही डाॅ. काकोडकर म्हणाले. कार्यक्रमास ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष जेष्ठराज जोशी, सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *