डॉ. सदानंद मोरे यांचे उद्या व्याख्यान
ठाणे दि.३१ :- ठाणे महापालिकेतर्फे विचारमंथन व्याख्यानमालेअंतर्गत लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त उद्या (मंगळवारी) १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि संत साहित्य अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोणताही मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत स्थानिकांचे प्रबोधन होणे गरजेचे – डाॅ. अनिल काकोडकर
‘स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान’ या विषयावर डॉ. मोरे यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता, डॉ. काशिनाथ घाणेकर लघू प्रेक्षागृहात होणार आहे.
