आमदार अपात्रता; नार्वेकर यांच्या नोटिसीला उत्तर न देण्याची उबाठा गटाची भूमिका
मुंबई, दि. १८
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाठविलेल्या नोटीसीला उत्तर न देण्याची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतली आहे.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर नार्वेकर यांनी शिवसेना आणि उबाठा गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून चौदा दिवसात उत्तर देण्यास सांगितले होते. मात्र मुदत संपूनही उबाठा गटाकडून नोटिसीला उत्तर देण्यात आलेले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर १६ आमदारांच्या अपात्रते संदर्भात आम्ही कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे या १६ आमदारांनीच नोटिसीला उत्तर देणे गरजेचे असल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
—-
