ठळक बातम्या

दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या परिसरातील रहिवाशांना सावधगिरीचे प्रशिक्षण

महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे कार्यशाळा
मुंबई, दि. २२
भारतीय भौगोलिक सर्वेक्षण विभागाने मुंबईतील दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या २४९ ठिकाणांचे सर्वेक्षण केले असून यापैकी ७४ ठिकाणे अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे.

या ७४ ठिकाणांच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे दुर्घटना घडल्यास काय करावे, काय करू नये याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
पश्चिम उपनगरातील बांदिवली टेकडी, यादव नगर, जोगेश्वरी (पश्चिम), पूर्व उपनगरातील कुर्ला कसाईवाडा, वाशी नाका चेंबूर येथील भारत नगर, घाटकोपर येथील वर्षानगर आदी परिसरातील रहिवाशांना प्रशिक्षण देण्यात आले.

महापालिकेने परिसरातील रहिवाशांसाठी सुट्टीच्या दिवशी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *