मेट्रो ३’ मार्गिकेतील २२ स्थानकांच्या नावाचे अधिकार खासगी कंपन्या, बँकांना
पाच वर्षांमध्ये २१६ कोटी रुपये महसूल मिळणार
मुंबई, दि. २२
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी ) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील २२ स्थानकांच्या नावाचे अधिकार खासगी कंपन्या, बँकांना देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून २२ जून ते १७ जुलैदरम्यान इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करता येणार आहेत.
कफ परेड, विधान भवन, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, दादर, शितलादेवी मंदिर, धारावी, विद्यानगरी, सांताक्रूझ विमानतळ (देशांतर्गत), सहार रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ आणि आरे या २२ स्थानकांच्या नावाच्या अधिकारासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
कोटक महिंद्रा बँकेकडे वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक, आयसीआयसीआय लोम्बार्डकडे, सिद्धिविनायक मेट्रो स्थानक, आयुर्विमा महामंडळाकडे (एलआयसी) चर्चगेट आणि हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाचे अधिकार देण्यात आले आहेत.
या कंपन्यांना प्रसिद्धीसाठी मेट्रो स्थानकात जागा मिळणार आहे. तसेच मेट्रो गाडीच्या घोषणांमध्ये आणि स्थानकांच्या नकाशांमध्ये या कंपन्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे. सोबतच त्या कंपन्यांचे नाव संबंधित स्थानकाच्या नावाआधी जोडण्यात येणार आहे. यातून एमएमआरसीला ‘मेट्रो ३’ कार्यान्वित झाल्यापासून पुढील पाच वर्षांमध्ये २१६ कोटी रुपये महसूल मिळणार आहे.
———