राजकीय

भाजपतर्फे महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात ५१ मेळावे, ५००हून अधिक सभा
मुंबई, दि. ३१
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात आजपासून महाजनसंपर्क अभियान हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार प्रवीण दरेकर आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करण्यास उत्सुक- राजदूत डॉ. राल्फ हेकनर

या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मोदी सरकारची विकास कामे आणि कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात ५१ रॅली, ५००हून अधिक सभा घेण्यात येणार आहेत, असेही दरेकर, शेलार म्हणाले.

बुरख्याच्या सक्तीला ‘मूर्खपणा’ म्हणण्याची हिंमत भुजबळ, पुरोगामी आणि ब्रिगेडी मंडळी दाखवतील का?

३१ मे ते ३० जून या कालावधीत हे अभियान सुरू राहणार आहे प्रत्येक लोकसभा मतदार संघातील १ हजार अशा पद्धतीने सर्व लोकसभा मतदार संघांतील ५ लाखांहून अधिक विशेष कुटुंबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *