गुन्हे-वृत

बृहन्मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामात गैरव्यवहार; कॅगच्या अहवालातील निष्कर्ष

मुंबई दि.२५ :- बृहन्मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष कॅगच्या अहवालात काढण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी हा अहवाल विधानसभा सभागृहात सादर केला.

मंदिर सरकारीकरणासह अन्य प्रश्नांसंदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामाचे कॅगकडून ऑडिट करण्यात आले आहे. त्यातून निधीचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. विशेष करून कोरोनाकाळात केलेल्या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून आला असल्याचे फडणवीस म्हणाले.

रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

महापालिकेच्या दोन विभागांची २० कामे टेंडरशिवाय देण्यात आलेली आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागात निविदा न मागवताच काम देण्यात आले आहे. रस्ते आणि वाहतूकमध्ये ५१ कामे सर्वेक्षणाशिवाय केली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *