ठळक बातम्या

केईएम रुग्णालयात ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ प्रकल्प सुरू

मुंबई दि.१५ :- जागतिक क्षयरोग दिनाच्यानिमित्ताने बृहन्मुंबई महापालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयात ‘व्होल जिनोम सिक्वेन्सिंग’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे औषधांना न जुमानणा-या क्षयरोगाची बाधा झालेल्या रुग्णांना सदर क्षयरोगावर मात करण्यासाठी कोणती औषधे द्यावीत, याचा निर्णय घेणे डॉक्टरांना अधिक सुलभ होणार आहे, अशी माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

बृहन्मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामात गैरव्यवहार; कॅगच्या अहवालातील निष्कर्ष

‘व्होल जिनोम सिक्वेन्सिंग’ (WGS) प्रकल्प सार्वजनिक आरोग्य खाते आणि “सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल” बृहन्मुंबई महापालिका अखत्यारितील संस्थांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. असा प्रकल्प याआधी ब्रिटनमध्ये राबविण्यात आला होता. देशातील पहिलाच प्रकल्प आहे, असे महानगरपालिका व्यवसाय विभाग प्रमुख शशी बाला यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *