Saturday, July 11, 2026
Latest:
ठळक बातम्या

अनिक्षा जयसिंघानीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई दि.१८ :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयाने अनिक्षा जयसिंघांनीला येत्या २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

निवृत्ती वेतन योजनेविषयी भारतीय मजदूर संघातर्फे परिसंवादाचे आयोजन

अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच हा संपूर्ण कट उपमुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणात अडकविण्यासाठी आखण्यात आल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.

श्रावण अधिकमास आल्याने नवीन शालिवाहन शकवर्ष १३ महिन्यांचे- ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण

चौकशीसाठी अनिक्षाला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणीही पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने मात्र अनिक्षाला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी २० फेब्रुवारी रोजी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *