इन्फल्युएंझा आजाराबद्दल जनजागृती करण्यात यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
मुंबई दि.१६ :- इन्फल्युएंझा संसर्ग हा विषाणुमुळे होणारा आजार असून तातडीने उपचार सुरु केल्यास हा तो लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. आणि याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केल्या. राज्यात नव्याने उद्भवलेल्या इन्फल्युएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजाराविषयीची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे पार पडली. त्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीटीची शक्यता
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनि आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव अश्विनी जोशी, आरोग्य आयुक्त धीरज कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत. यासाठी लागणारा औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करावी. तसेच सध्या सुरु असलेल्या कर्मचा-यांच्या संपामुळे उपचार करण्यात अडचण येऊ नये यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी आणि आवश्यकता वाटल्यास खासगी कंत्राटी कर्मचारी नेमुन उपचाराचे काम सुरु ठेवावे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
ठाणे, वसई खाडी आणि उल्हास नदी जोडून मुंबई, वसई, ठाणे, कल्याण जलवाहतूक सुरू करणार
इन्फल्युएंझा म्हणजे काय?
इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. इन्फल्युएंझाचे टाईप A B आणि C, असे प्रकार आहेत. इन्फल्युएंझा टाईप ए चे उपप्रकार H1 N1, H2N2,H3 N2 असे आहेत. यात ताप, खोकला,घशात खवखव , धाप लागणे , न्युमोनिया अशी लक्षणे आढळतात.
