ठळक बातम्या

‘गड-दुर्ग महामंडळा’च्या स्थापनेसाठी शुक्रवारी ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा

मुंबई दि.०१ :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या गड किल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी तसेच येथील अनधिकृत कबरी, दर्गे, मशिदी हटविण्यासाठी स्वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळ’ स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या ३ मार्च रोजी मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक आणि ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’चे समन्वयक सुनील घनवट यांनी आज येथे दिली.

सभागृहाचे कामकाज स्थगित करुन जनतेच्या प्रश्नावरील चर्चा सत्ताधाऱ्यांनी टाळली- नाना पटोले

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा वॉरियर्स् गड-किल्ले संवर्धक (महाराष्ट्र राज्य) राहुल खैर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे मुंबई विभाग धारकरी पुरूषोत्तम बाबर, श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी)’चे संस्थापक-अध्यक्ष प्रभाकर भोसले, ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’चे निमंत्रक सागर चोपदार यावेळी उपस्थित होते.  महामोर्चाची सुरुवात शुक्रवारी दुपारी बारा वाजता मेट्रो चित्रपटगृहापासून होणार असून मोर्चाची सांगता आझाद मैदानावर होणार आहे.

मध्य रेल्वेवरील विना तिकीट प्रवाशांकडून १०० कोटी ३१ लाख रुपये दंड वसूल

मोर्च्यामध्ये राज्यभरातून विविध गड-दुर्गप्रेमी संघटना आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे २५ हून अधिक वंशज, विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी नागरिक सहभागी होणार असल्याचेही घनवट यांनी सांगितले.

किल्ले रायगड, किल्ले विशाळगड, किल्ले कुलाबा, किल्ले लोहगड, किल्ले वंदनगड आदींवर अतिक्रमणे झाल्याचे लक्षात आले आहे. ‘श्रीक्षेत्र मलंगगड’ यालाही ‘हाजी मलंग’ बनविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. ठाण्यातील ‘दुर्गाडी किल्ल्या’वर ईदला नमाजपठण होते, तेव्हा मंदिरात पूजेलाही बंदी केली जाते.

होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या दहा विशेष गाड्या

विशाळगडावरील देवतांची मंदिरे, बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांची समाधी जीर्णावस्थेत आहेत, तसेच अनेक ठिकाणी गडाची दुःस्थिती झालेली दिसून येते; मात्र गडावरील दर्ग्याचे सुशोभिकरण करून अतिक्रमण वाढतच आहे. हे वेळीच रोखले नाही, तर उद्या प्रत्येकच गड-दुर्गांची ही स्थिती होईल, अशी भीती घनवट यांनी व्यक्त केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीभोवती मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने हटवून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात असले फाजिल लाड चालणार नाहीत, हे दाखवून दिले आहे. त्याच पद्धतीने राज्यातील ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी आमची मागणी असल्याचे घनदाट यांनी सांगितले. या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी 7020383264 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’ने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *