राजकीय

सभागृहाचे कामकाज स्थगित करुन जनतेच्या प्रश्नावरील चर्चा सत्ताधाऱ्यांनी टाळली- नाना पटोले

मुंबई दि.०१ :- जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षाकडून ठरवून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.‌ खासदार संजय राऊत यांनी विधिनमंडळाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. भाजपने त्यासंदर्भात हक्कभंग ठरावही आणला होता.

मध्य रेल्वेवरील विना तिकीट प्रवाशांकडून १०० कोटी ३१ लाख रुपये दंड वसूल

सभागृहात कोणाचाही विरोध नव्हता. अध्यक्षांनी यावर तातडीने निर्णय द्यायला हवा होता, असेही पटोले म्हणाले. गॅस सिलेंडरचे दरही वाढले आहेत, महागाई, दरवाढ करुन सरकार जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, कृषीपंपाची वीज जोडणी कापली जात आहे. या सर्व मुद्द्यांवर सभागृहात चर्चा व्हावी अशी विरोधी पक्षांची भूमिका होती.

होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या दहा विशेष गाड्या

जनतेचे हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी होती पण सत्ताधाऱ्यांनी ती होऊ दिली नाही, असे पटोले यांनी सांगितले. दरम्यान विरोधी पक्षांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. घरगुती गॅसचे दर कमी करा, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज द्या, नाहीतर खूर्च्या खाली करा. देशद्रोदी सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *