ठळक बातम्या

महापालिका सुरक्षा दलाचे आधुनिकीकरण अद्ययावत प्रशिक्षण दिले जाणार- अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार

बृहन्मुंबई महापालिका सुरक्षा दलाचा ५७ वा वर्धापनदिन साजरा

मुंबई दि.०१ :- बृहन्मुंबई महापालिका सुरक्षा दलाचे अत्याधुनिकीकरण करून कर्मचा-यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यासह भरती प्रक्रिया राबविण्याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी आज येथे केले. महापालिका सुरक्षा दलाच्या ५७ व्या वर्धापनदिन आणि पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. भांडुप (पश्चिम) परिसरातील खिंडीपाडा मार्गावर असणा-या सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात हा कार्यक्रम पार पडला.

‘गड-दुर्ग महामंडळा’च्या स्थापनेसाठी शुक्रवारी ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा

महापालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण व सुरक्षितेच्या दृष्टीने सुरक्षा दलाची महत्वपूर्ण भूमिका आहे. या विभागातील कर्मचा-यांची संख्या कमी असतानाही हा विभाग नेमून दिलेली कर्तव्ये चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. ही कौतुकास्पद बाब असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी नमूद केले. प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी सुरक्षा दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी विविध स्तरावर पारितोषिक मिळविल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.‌

सभागृहाचे कामकाज स्थगित करुन जनतेच्या प्रश्नावरील चर्चा सत्ताधाऱ्यांनी टाळली- नाना पटोले

यामध्ये क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या चमुचे कप्तान समीर माने, कबड्डी स्पर्धेतील विजेत्या चमुचे कप्तान मनोज चौगुले, रस्सीखेच स्पर्धेतील विजेते लक्ष्मण गोळे, व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्या चमुचे कप्तान हरिश्चंद्र पाटील यांचा समावेश होता. वर्धापनदिनी झालेल्या आयोजित संचलनामध्ये सुरक्षा दल प्लाटून क्रमांक ३ च्या संचलनास सर्वोत्कृष्ट संचलनाचे पारितोषिक डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्लाटून क्रमांक ३ चे कप्तान शेखर उधराज यांनी प्लाटूनच्या वतीने सर्वोत्कृष्ट संचलनाचा मानाचा चषक स्वीकारला. लवकरच निवृत्त होणारे सहाय्यक सुरक्षा अधिकारी संदीप पाटील यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *