जनतेला कधीही गृहित धरू नये हा बोध कर्नाटक निवडणूक निकालातून घ्यावा – राज ठाकरे
अंबरनाथ दि.१४ :- जनतेला, लोकांना कधीही गृहित धरू नये, हा बोध कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालातून सर्वांनी घ्यावा,असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले. मनसे अध्यक्ष सध्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून रविवारी ते अंबरनाथ येथे आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ठाकरे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
‘आयटीआय’ कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये
विरोधी पक्ष हा जिंकत नसतो, तर सत्ताधारी हरत असतात. मला वाटते हा स्वभावाचा, वागणुकीचा पराभव आहे. आपले कोण वाकडे करू शकतो अशा विचाराचा जो असतो त्याचा हा पराभव आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रातील निकालाबाबत लगेच सांगता येणार नाही.