कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाईचा भडका: प्रभाग २७ मधील लोकप्रतिनिधींचे महापालिका आयुक्तांना निवेदन; ठोस उपायांची मागणी
डोंबिवली:
मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नुकताच कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना तब्बल ३६ तास तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मधील (टिळक नगर, गोग्रासवाडी, अंबिका नगर, पाथर्ली) अनियमित पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
या शिष्टमंडळात प्रभाग २५ ते २८ परिसरातील लोकप्रतिनिधी महेशजी पाटील मंदाताई पाटील. सायलीताई विचारे, आणि अभिजीत थरवळ यांचा समावेश होता. प्रभागातील नागरिकांचा हा मूलभूत पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक कारवाई करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त डोंबिवलीत ‘व्योम’ संस्थेकडून दोन ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
पर्यायी वीजपुरवठा व्यवस्था: मोहिली जलशुद्धीकरण केंद्रासाठी (WTP) तातडीने ‘स्टँडबाय’ (Standby) वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात वीज खंडित झाल्यावर पाणीपुरवठा बाधित होणार नाही.
‘झोनिंग’ प्रणाली लागू करणे: पाण्याचा दाब वाढवून परिसरातील शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी योग्य ‘झोनिंग’ प्रणाली राबवण्यात यावी.
नवीन जलवाहिन्या टाकणे: प्रभागातील अनेक दशके जुन्या व कमी व्यासाच्या जलवाहिन्या बदलून त्याऐवजी मोठ्या क्षमतेच्या नवीन पाईपलाईन त्वरित टाकण्यात याव्यात.
पाथर्लीसाठी स्वतंत्र पाईपलाईन: पाथर्ली परिसरातील पाणीसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून टाकीवरून स्वतंत्र नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी.
डोंबिवलीत भाजपच्या वतीने NCMC स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन; प्रवाशांना मिळणार विविध सवलतींचा लाभ!
नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असून, महापालिका प्रशासन यावर त्वरित कायदेशीर व तांत्रिक पावले उचलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

