Thursday, August 20, 2026
Latest:
सामाजिक

स्वातंत्र्यदिनानिमित्त डोंबिवलीत ‘व्योम’ संस्थेकडून दोन ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

डोंबिवली:

भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘व्योम संस्था, डोंबिवली’ (व्योम स्वास्थ्यम्) यांच्या वतीने शनिवारी, १५ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत “रक्त द्या, जीवन वाचवा – देशासाठी, मानवतेसाठी” हा संदेश देत हे शिबीर डोंबिवली पूर्वेतील दोन प्रमुख ठिकाणी एकाच वेळी पार पडणार आहे.

नागरिकांच्या सुविधेसाठी आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांना सहभागी होता यावे या उद्देशाने संस्थेने डोंबिवली पूर्वेमध्ये दोन स्वतंत्र केंद्रे निश्चित केली आहेत. सकाळी ८.०० ते दुपारी २.०० या वेळेत हे रक्तदान शिबीर पार पडणार आहे.

रक्तदान शिबिराची सविस्तर माहिती:

दिनांक: शनिवार, १५ ऑगस्ट २०२६

वेळ: सकाळी ८:०० ते दुपारी २:००

रक्तदान केंद्रे (ठिकाण):

ठिकाण क्र. १: टिळक नगर विद्या मंदिर शाळा, टिळक नगर, डोंबिवली (पूर्व)

ठिकाण क्र. २: दीर्घायू पंचकर्म अँड कॉस्मेटिक क्लिनिक (Deerghayu Panchkarma and Cosmetic Clinic), मिलापनगर MIDC, डोंबिवली (पूर्व)

“आपल्या एका छोट्या कृतीने कोणाचे तरी संपूर्ण आयुष्य बदलू शकते,” असा विचार मांडत व्योम संस्थेने डोंबिवलीकर नागरिकांना, तरुणांना आणि विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नम्र आवाहन केले आहे.

अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क:

श्वेता: ७९७७०२६३१३

दीपाली: ९९६७७०५७८०