Thursday, August 20, 2026
Latest:
मनोरंजन

अमेरिकेतील स्थलांतर वादावर भाष्य करणाऱ्या ‘Undocumented.PDF’ लघुपटाचा ९ ऑगस्टला वर्ल्ड प्रीमियर

NAFA Films ची निर्मिती; काँग्रेसमन श्री ठाणेदार आणि अभी घोलप यांची मुख्य भूमिका

अमेरिकेतील ‘ICE’ कारवाईची पार्श्वभूमी आणि स्थलांतरितांच्या भावविश्वाचा संवेदनशील वेध

सॅन होजे, कॅलिफोर्निया:

अमेरिकेत सध्या तीव्र चर्चेत असलेल्या यू.एस. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) कारवाईच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ‘Undocumented.PDF’ या मराठी लघुपटाचा (इंग्लिश सबटायटल्ससह) वर्ल्ड प्रीमियर येत्या ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता सॅन होजे (कॅलिफोर्निया) येथील ‘NAFA Film Festival 2026’ च्या मुख्य सभागृहात होणार आहे.

NAFA Films च्या बॅनरखाली निर्मित या लघुपटाची कथा कॅलिफोर्नियास्थित लेखिका अमृता हार्डीकर यांनी लिहिली असून दिग्दर्शन हर्ष महाडेश्वर (ह्यूस्टन) यांनी केले आहे. अमेरिकेचे काँग्रेसमन श्री ठाणेदार आणि NAFA चे संस्थापक अध्यक्ष अभी घोलप हे या लघुपटाचे निर्माते आहेत. तर भालचंद्र कुलकर्णी यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी सांभाळली असून अमोल थिटे व गोविंद उंकळकर हे सहनिर्माते आहेत.

सॅन होजेत मराठी संस्कृतीचा जागतिक जल्लोष! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘NAFA 2026’ फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहणार

कायदेशीर धोरण विरुद्ध मानवी वेदना

अमेरिकेत ICE च्या कठोर कारवायांमुळे एकीकडे कायद्याची अंमलबजावणी आणि सुरक्षेचा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे त्यामुळे स्थलांतरितांमध्ये निर्माण झालेली भीती, विभक्त होणारी कुटुंबे आणि अनेक वर्षांपासून तिथे राहणाऱ्या लोकांच्या अनिश्चित भविष्याची व्यथा या लघुपटात मांडण्यात आली आहे.

हॉलिवूडच्या झगमगाटात रंगणार ‘नाफा २०२६’! सॅनहोजेमध्ये ७ ते ९ ऑगस्टदरम्यान तिसरा मराठी चित्रपट महोत्सव

“हा केवळ स्थलांतराच्या प्रश्नावरील चित्रपट नसून माणसाच्या अस्तित्वाची, ओळखीची आणि आशेच्या संघर्षाची कथा आहे. जगभरातील स्थलांतर हा केवळ राजकीय किंवा कायदेशीर विषय नसून लाखो कुटुंबांच्या भावनांशी जोडलेला मानवी प्रश्न आहे. प्रेक्षक या कथेशी भावनिक नाते जोडतील असा विश्वास आहे.”

अभिजित (अभी) घोलप, निर्माते तथा संस्थापक-अध्यक्ष, NAFA

मानवी मूल्ये आणि जागतिक स्थलांतराच्या वास्तवाला भिडणारा ‘Undocumented.PDF’ हा लघुपट सध्या जगभरातील चित्रपटप्रेमी आणि मराठी वर्तुळात प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरला आहे.