६५ वर्षांवरील ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी परवाना धारकांना निवृत्ती सन्मान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरळी, मुंबई येथे परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ इमारतीचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी वाहन चालकांसाठी २०२४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळातर्फे, ६५ वर्षांवरील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी परवाना धारकांना ‘निवृत्ती सन्मान’ योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान निधीचे वितरण केले.
राज्यात १४ खाणी सुरू करून महसूल वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री फडणवीस
प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान निधी प्राप्त ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी परवाना धारक बाबासाहेब रामभाऊ कदम, अनंत सहदेव कदम, लक्ष्मण तुकाराम गोळे, अरुण नामदेव शिणलकर, पुरुषोत्तम भिकाजी सहस्त्रबुद्धे होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आ. मनीषा कायंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसनेते शिवकुमार प्रकरण: कुठल्या बिळात लपलात ? कोणता बोळा तोंडात कोंबून घेतलात ?