पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स तयार केला – मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुला’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचे हॅपीनेस इंडेक्स होते, त्यांनी महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स तयार करण्याचे काम केले. प्रत्येक व्यक्ती आपले दुःख विसरुन निखळपणे हसू शकेल, असे त्यांचे साहित्य आणि वक्तव्य होते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
काँग्रेसनेते शिवकुमार प्रकरण: कुठल्या बिळात लपलात ? कोणता बोळा तोंडात कोंबून घेतलात ?
पु. ल. देशपांडे यांचे बोलणे अतिशय चपखल असायचे, मर्मावर बोट ठेवताना समोरच्याला कुठलेही दुःख होणार नाही, असे त्यांचे लिखाण होते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या काळातील पु. ल. देशपांडे यांचा एक किस्साही सांगितला. तसेच पु. ल. आज असते तर त्यांनी राजकीय क्षेत्रातील लोकांना पाहून व्यक्ती आणि वल्ली नव्हे तर फक्त वल्लीच…, असे लेखन केले असते, असे मुख्यमंत्री फडणीस म्हणाले.
ऊर्जा परिवर्तनासाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुला’ची निर्मिती अतिशय सुंदर केली आहे. मराठी माणूस रसिक असून कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मराठी कलाकारांचे तसेच रसिकांचे योगदान मोठे असून संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, भीमसेन जोशी, आशा भोसले, नाटक आणि सिनेमा क्षेत्रात श्रीराम लागू, निळू फुले तर साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, त्याचबरोबर लोककला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्यातून मोठे योगदान दिले आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतिहासात एखाद्या संस्कृतीचे मूल्यमापन तिथल्या साहित्य, कलानिर्मितीवर केले जाते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या गावागावांतील नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठीचे काम निश्चितचे केले जाईल, अशी ग्वाही दिली.
मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा दिल्ली जिंकणार – मुख्यमंत्री फडणवीस
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अॅड. आशिष शेलार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. कालिदास कोळंबकर, आ. भाई गिरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.