Sunday, July 19, 2026
Latest:
सामाजिक

देशसेवेचे व्रत! अभाविप मुंबईतर्फे २० जुलैला ‘पूर्णवेळ कार्यकर्ता शुभेच्छा कार्यक्रम’; मुंबईतील ९ ध्येयवादी तरुण पूर्णवेळ कार्यासाठी सज्ज

मुंबई:

ज्ञान, शील, एकता‘ या त्रिसूत्रीच्या आधारे गेली ७८ हून अधिक वर्षे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात निरंतर कार्यरत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) मुंबई महानगराच्या वतीने ‘पूर्णवेळ कार्यकर्ता शुभेच्छा कार्यक्रम २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

आगामी सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता माटुंगा येथील प्रसिद्ध वेलिंगकर कॉलेज सभागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे.

अभाविप, कोकण प्रांताचा प्रांत अभ्यास वर्ग नुकताच यशस्वीरीत्या संपन्न झाला. या अभ्यासवर्गातून प्रेरणा घेत मुंबई महानगरातील ९ विद्यार्थी कार्यकर्त्यांनी ‘मी समाजाचे देणे लागतो’ या उदात्त भावनेतून पूर्णवेळ कार्याची अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची भूमिका स्वीकारली आहे.

यामध्ये मुंबई महानगरातील ९ ध्येयवादी आणि उच्चशिक्षित कार्यकर्त्यांचा समावेश असून, आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका निश्चित कालावधीसाठी आपले घर-दार सोडून संघटना सांगेल त्या भागात राष्ट्रकार्य व व्यक्तिनिर्माणाच्या अभाविपच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी हे तरुण सज्ज झाले आहेत. त्यांच्या याच प्रेरणादायी निर्णयाचे कौतुक व सन्मान करण्यासाठी या शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कल्याण जिल्ह्याकडून ‘पूर्ण वेळ कार्यकर्त्यांचा’ गौरव व शुभेच्छा सोहळा; २१ जुलै रोजी आयोजन

प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांची उपस्थिती:

या गौरव सोहळ्याला मुख्य वक्ता म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख रामलाल जी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे उपस्थित राहणार आहेत.

अभाविप मुंबईच्या महानगर अध्यक्ष प्रा. रुपाली बोरीकर आणि महानगर मंत्री प्रशांत माळी यांनी या जाहीर कार्यक्रमास राष्ट्रप्रेमी नागरिक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहून या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना शुभेच्छा व प्रेरणा द्यावी, असे नम्र आवाहन विनीत म्हणून केले आहे.

वर्षभरात १८,८४२ स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पूर्ण; जनसांख्यिकी असंतुलन, अमली पदार्थांचा प्रभाव आणि राममंदिर दानप्रकरणावर संघ बैठकीत चिंता