Monday, July 20, 2026
Latest:
वाहतूक दळणवळण

गडकरी-फडणवीसांचा पुण्यासाठी मास्टरप्लॅन! डबल डेकर हायवेवर धावणार मेट्रो, वाहतूक कोंडी मिटणार!

पुणे। पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ३ प्रमुख उन्नत (Elevated) महामार्गांचे भव्य भूमीपूजन आज संपन्न झाले.

हे तिन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याच्या अंतर्गत भागातील आणि औद्योगिक वसाहतींमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.

या ३ प्रमुख महामार्गांचे झाले भूमीपूजन

१. पुणे-शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग: एकूण लांबी ५३.४ किमी असून, यामध्ये ३५ किमी लांबीचा ४ पदरी उन्नत (Elevated) रस्ता तयार केला जाईल. या उन्नत रस्त्याखाली ४ पदरी जमिनीला समांतर सेवा रस्ता (Service Road) असणार आहे.

२. तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग: एकूण लांबी ५३.२० किमी असून, यात २६ किमी लांबीचा उन्नत मार्ग असेल. हा मार्ग औद्योगिक पट्ट्यासाठी गेमचेंजर ठरेल.

३. हडपसर-यवत उन्नत महामार्ग: एकूण लांबी ३१ किमी असून, यात ६ पदरी उन्नत आणि ६ पदरी जमिनीलगत रस्ता असेल. यामुळे प्रवासाचा किमान ५० मिनिटांचा वेळ वाचणार असून इंधन आणि प्रदूषणात मोठी कपात होईल.

जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी जलसंपदा प्रकल्पांच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीवर भर

देशात पहिल्यांदाच नवा प्रयोग: सरकारला मिळणार ₹९५० कोटींचा थेट निधी

या रस्ते प्रकल्पांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये प्रथमच बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (BOT) च्या एका नवीन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,

“या नव्या मॉडेलमुळे सरकारला केवळ टोलचा महसूल मिळणार नाही, तर कंपन्यांकडून ‘अपफ्रंट’ (थेट) निधी मिळणार आहे. यानुसार पहिल्या प्रकल्पातून ₹५०० कोटी, दुसऱ्यातून ₹३०० कोटी, तर तिसऱ्या प्रकल्पातून ₹१५० कोटी, असा एकूण ₹९५० कोटींचा थेट निधी सरकारला मिळणार असून याचा वापर भूसंपादनासाठी केला जाईल.”

Double Decker मॉडेल: मेट्रोच्या खर्चात ४०% बचत होणार!

पुणे-शिरूर आणि हडपसर-यवत या दोन्ही मार्गांची रचना अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. येथे ‘डबल डेकर’ (Double Decker) मॉडेल वापरण्यात येणार आहे, म्हणजेच खाली एलिव्हेटेड रोड असेल आणि त्यावर थेट मेट्रो धावेल. या एकाच रचनेमुळे भविष्यात होणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात तब्बल ४० टक्क्यांची बचत होणार आहे. हे तिन्ही प्रकल्प ४ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले, तरी BOT पद्धतीमुळे काम वेळेआधी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

देशसेवेचे व्रत! अभाविप मुंबईतर्फे २० जुलैला ‘पूर्णवेळ कार्यकर्ता शुभेच्छा कार्यक्रम’; मुंबईतील ९ ध्येयवादी तरुण पूर्णवेळ कार्यासाठी सज्ज

पुरंदर विमानतळ आणि पुण्याच्या विकासावर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पुरंदर विमानतळ: पुरंदर विमानतळाचे भूसंपादन वेगाने सुरू असून, याच वर्षी निविदा प्रक्रिया (Tender Process) पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विमानतळ सुरू होईपर्यंत तिथे रस्ते आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी आधीच तयार असेल.
दीर्घकालीन नियोजन: पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, सांडपाणी प्रक्रिया आणि समान पाणीवाटपासाठी दीर्घकालीन प्लॅनिंग केले जात आहे.

ग्लोबल हब: पुणे हे अभियांत्रिकी, स्टार्टअप आणि डीप टेकचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असून, या नव्या पायाभूत सुविधांमुळे शहराच्या विकासाला रॉकेट स्पीड मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मान्यवरांची उपस्थिती

या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

‘यू-डायस प्लस’ अहवालाचे वास्तव: महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीचा बुरखा फाडणारी आकडेवारी