राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जयपूर येथे रोड शो
मुंबई दि.२४ – राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदे यांनी भाजपा उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. शिंदे यांनी जयपूरसह काही ठिकाणी रोड शो केला. तसेच कोटपुतली विधानसभा मतदार संघात हंसराज पटेल यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा घेतली.
राजस्थानमध्ये भगवी लाट असून यावेळी भाजपाचे सरकार बहुमताने सत्तेवर येईल. गेल्या पाच वर्षांत काँग्रेस सरकारने लोकांनी फसवणूक केली असून राज्यात रस्त्यांची दुरावस्था आहे. तसेच भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचारात राजस्थानमध्ये वाढ झाली असून सरकारने शेतकऱ्यांची फसणूक केल्याचा आरोप शिंदे यांनी केला.