मुंबई, ठाणे, पालघर परिसरा शनिवार, रविवारी पावसाची शक्यता
मुंबई दि.२४ – मुंबईत काही ठिकाणी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस पाऊस पडण्याची, तसेच ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या किनारपट्टी जवळच्या परिसरापर्यंत बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून तीन किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या हिवाळी मोसमी वारे आणि चक्रिय वाऱ्याची स्थिती यामुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये सध्या पाऊस पडत आहे. ही प्रणाली अरबी समुद्रात उतरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे.