वंचित बहुजन आघाडीतर्फे २५ नोव्हेंबरला मुंबईत संविधान सन्मान महासभेचे आयोजन
खासदार राहुल गांधी यांना सभेचे निमंत्रण
मुंबई दि.२३ – वंचित बहुजन आघाडीतर्फे येत्या २५ नोव्हेंबरला मुंबईत दादर येथे शिवाजी उद्यानात संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांना पत्र पाठवून निमंत्रण दिले आहे.
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला २५ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी पार्कवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.